अवैध वाळूची वाहतूक करणारे गोवा आणि सिंधुदुर्ग येथील २८ डंपर कह्यात !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध वाळूउपसा, वाळूची अवैध वाहतूक आदी प्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी कायद्याचे कठोर पालन करणे आवश्यक !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध वाळूउपसा, वाळूची अवैध वाहतूक आदी प्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी कायद्याचे कठोर पालन करणे आवश्यक !
प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठकीत सदस्य सचिवांना न्यायालयात फौजदारी तक्रार प्रविष्ट करण्याचे अधिकार दिले असून सनबर्नविरुद्ध लगेच खटला प्रविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या पोलीस प्रशासनावर गुन्हेगारी वाढू न देण्याचे दायित्व असते, त्या प्रशासनातील कारागृह अधिकार्यांनाच जर लैंगिक अत्याचारप्रकरणी अटक होत असेल, तर अशा नैतिकताहीन प्रशासनाचा धाक गुन्हेगारांवर राहील का ?
जागतिक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी ३१ जानेवारीला कोल्हापुरात येत असून त्यांच्या उपस्थितीत महासत्संग आणि १ फेब्रुवारीला श्री महालक्ष्मी होम यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे विश्वस्त श्री. प्रदीप खानविलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे आंदोलन १९ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्यात आलेले असले, तरी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना काणकोण रेल्वेस्थानकावर थांबा मिळेपर्यंत हा लढा चालूच रहाणार असल्याचे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
सर्वधर्मियांनी ध्वनीक्षेपक वापरतांना त्याच्या आवाजाचा इतरांना त्याचा त्रास होणार नाही, तसेच याविषयी कोणतीही तक्रारी येणार नाही, याची काळजी घ्या.
वर्ष १९९९ मध्ये म्हादई आणि नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य घोषित झाल्यानंतर म्हादईचे पाणी वळवण्याचे थांबवण्यासाठी त्यांचा ढालीसारखा उपयोग करण्यात गोवा सरकार अपयशी ठरले. याविषयी २ दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाची आवश्यकता आहे.
कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी वळवल्याचा निषेध करण्यासाठी गोव्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन ‘गोवा वाचवा म्हादई वाचवा’ ही आघाडी स्थापन केली आहे.
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी पुणे येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
‘पाकिस्तान्यांकडून वारंवार आक्रमणे होत असतांना ‘आक्रमण करणे’ हेच स्वरक्षणाचे सर्वोत्तम साधन आहे (Attack is the best policy of defence), हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकाही सरकारला ज्ञात नाही; म्हणून भारत आणि हिंदूही नेहमी शत्रूंकडून मार खातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले