हिंजवडी (पुणे) – शालेय जीवनामध्ये मुले मैदानी खेळ, स्पर्धा विसरले आहेत. ते अधिकाधिक वेळ भ्रमणभाषचा वापर करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे भावी पिढी बरबाद होत असून शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही भ्रमणभाष वापरण्यावर बंदी करावी. मुलांना थोडे तरी संप्रदायाचे शिक्षण द्या, धर्म वाचवण्याकरिता तरी किमान सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले आहे. ते थेरगाव (पुणे) येथे श्री दत्तमूर्ती स्थापनेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनामध्ये बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शालेय जीवनामध्ये मुलांना भ्रमणभाषची आवश्यकता काय ? त्यासाठी शासन दरबारी काही नियमावली करता येते का ? ते पहावे.