कराड येथे ‘यशवंत महोत्सवा’चे आयोजन !

यशवंत बँकेच्या वतीने ‘यशवंत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांची ‘महिमा साडेतीन शक्तीपीठांचा’ या विषयावर २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत श्री कृष्णामाई घाट या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता संगीतमय कथा सादर होणार आहे.

लिंबागणेश (जिल्हा बीड) येथे सरपंचपदाच्या उमेदवाराच्या ‘शिट्टी’ चिन्हाला ‘फेविस्टीक’ लावले !

जिल्ह्यातील लिंबागणेश येथील मतदानाची प्रक्रिया चालू असतांना प्रभाग क्रमांक २ मतदान केंद्र क्रमांक २/८५ मधील ‘ई.व्ही.एम्. मशीन’ शिट्टी चिन्ह असलेल्या बटणावर ‘स्टीक फास्ट’ लावून ते बटन बंद करण्यात आले होते.

नगर येथे राज्यकर अधिकार्‍यावर ४ सहस्र रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा नोंद !

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्यासच इतरांवर जरब बसेल !

कल्याण येथे रिक्शाचालकाकडे पैसे मागणार्‍या वाहतूक शाखेच्या अधिकार्‍याचे स्थानांतर !

कल्याण येथील कोळसेवाडी वाहतूक शाखेचा अधिकारी निवृत्ती मेळावणे याने एका रिक्शाचालकाकडे ५०० रुपये मागून २०० रुपये घेतल्याचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे.

सरकारी शाळेत हिंदूंना धर्मशिक्षण द्या !

बरेलीच्या कमला नेहरू पूर्व माध्यमिक विद्यालय या सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून ‘मेरे अल्ला’ ही मदरशांतील प्रार्थना म्हणून घेण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाल्यावर शाळेचे मुख्याध्यापक नाहिद सिद्दीकी यांना निलंबित करण्यात आले आहे.

हिंदुविरोधी, देश तोडू पहाणारा आणि ख्रिस्त्यांना धर्मांतरासाठी आमंत्रण देणारा द्रमुक !

तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् हा एन्.व्ही. रामासामी पेरियार यांच्या विचारांवरच चालणारा पक्ष आहे. द्रमुकचे प्रमुख ए.के. स्टॅलिन आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री असून त्यांचा पक्ष हिंदुविरोधी विचारधारेसाठी कुख्यात आहे.

‘विशेषतः रात्रीचे अन्न पचलेले नसतांना सकाळी खाण्याने अनेक विकार होतात’, असे चरक महर्षींनीही सांगणे

रात्रीचे जेवण पचलेले नसतांना सकाळी अल्पाहार करणे, हे अन्नविष निर्मितीचे पुष्कळ मोठे कारण आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट इत्यादी सर्व आयुर्वेद महर्षींनी विशेषतः रात्रीचे अन्न पचलेले नसतांना दुसरे अन्न ग्रहण करू नका’, असे वारंवार सांगितले आहे.

एकमेकांच्या साहाय्याने लागवड करा !

‘परसबाग किंवा छतावरील लागवडीचा आवाका मर्यादित असतो. तेव्हा जीवामृत, घनजीवामृत, बियाणे इत्यादी गोष्टी एकाच परिसरात किंवा एकाच गावात रहाणार्‍या ४ – ५ जणांनी मिळून आपसांत वाटून घेतल्या, तर वेळ आणि पैसे या दोघांची बचत होऊ शकते !

भारतीय संस्कृतीची मूलाधार : गोमाता !

पांजरपोळ (पुणे) येथे चालू असलेल्या ‘कामधेनू महोत्सव अर्थात् विश्व गो परिषद २०२२’च्या निमित्ताने…