कराड येथे ‘यशवंत महोत्सवा’चे आयोजन !

कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका

कराड, २२ डिसेंबर (वार्ता.) – येथील यशवंत बँकेच्या वतीने ‘यशवंत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांची ‘महिमा साडेतीन शक्तीपीठांचा’ या विषयावर २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत श्री कृष्णामाई घाट या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता संगीतमय कथा सादर होणार आहे. ‘यशवंत महोत्सवा’चे हे १२ वे वर्ष असून कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.