नगर येथे राज्यकर अधिकार्‍यावर ४ सहस्र रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा नोंद !

नगर – व्यवसायाचा सेवाकर क्रमांक (जी.एस्.टी.) वेळेत धारिका सादर न केल्यामुळे रहित झाला होता. तो कार्यान्वित करण्याकरता राज्यकर अधिकारी सारिका निकम यांनी ४ सहस्र रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील ३० वर्षीय तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्याने नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार दिली होती.

संपादकीय भूमिका 

अशा लाचखोरांवर कठोर कारवाई केल्यासच इतरांवर जरब बसेल !