नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्यापूर्वी विमानतळाच्या परिसरात कर्नाटक सरकारचे फलक !

कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक हे फलक लावण्यात आले आहेत का ?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा होण्यासाठी आक्रमक होण्याची आवश्यकता ! – सौ. चित्रा वाघ

वसई येथे रहाणारी श्रद्धा वालकर हिच्या ‘लव्ह जिहाद’च्या घटनेचे संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यघटनेनुसार १८ वर्षांपुढील वयाची मुले सज्ञान असतात. त्यांना कायद्याने स्वत: निर्णय घेण्याचे अधिकार असल्यामुळे पोलिसांचा नाईलाज होतो.

भोर (जिल्हा पुणे) येथे समस्त हिंदूंच्या वतीने ‘भव्य हिंदु धर्मरक्षक’ मोर्च्याचे आयोजन

येथे २ डिसेंबर या दिवशी देशातील लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या घटनांच्या निषेधार्थ आणि त्यांच्या विरोधात सरकारने कडक कायदे करावेत, या मागणीसाठी येथील समस्त हिंदूंच्या वतीने ‘भव्य हिंदु धर्मरक्षक’ मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथे कोरोना चाचणीसाठी मिळालेल्या ‘रॅपिड अँटिजेन किट’ प्रकरणातील घोटाळा उघड !

गरजू रुग्णांना वेठीस धरून ‘मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा’ प्रकार डॉक्टरांनी करणे, हे संतापजनक आणि गंभीर आहे. अशा डॉक्टर आणि कर्मचारी यांना कठोर शिक्षेसह त्यांच्याकडून सर्व रक्कम वसूल करण्याचीही शिक्षा द्यावी !

पुणे येथे केंद्रीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन तरुणीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या !

तरुणींनो, त्रास देणार्‍यांना कंटाळून आत्महत्या न करता साधना करून मनोबल वाढवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन त्रास देणार्‍यांनाच सळो की पळो करून सोडा !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात भगिनींना साहाय्य करण्यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल ‘हेल्पलाईन’सह अहोरात्र सज्ज ! – शंकर गायकर, विभागीय संघटक

महाद्वार रोड येथील डॉक्टर हेगडेवार चौकातील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या ‘हेल्पलाईन’च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

कोकणरेल्वे मार्गावर धावणार ४ विशेष गाड्या !

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे विभागाने कोकण रेल्वे मार्गावर ४ हिवाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोकणात जाणार्‍या पर्यटकांची संख्या पुष्कळ वाढली आहे.

नागपूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित !

उद्धटपणे आणि अनैतिकपणे वागणारे अधिकारी अन् त्यांना वाचवणारे वरिष्ठ अधिकारी यांना बडतर्फ करून कायमचे घरी पाठवा. असे अधिकारी सरकारी विभागात काम करण्याच्या पात्रतेचे आहेत का ?

मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींकडे लाखो रुपयांचे वीजदेयक थकित, तर शेतकर्‍यांवर महावितरणची कारवाई !

लोकप्रतिनिधींना वेगळा नियम लावल्यास कधीतरी वीजदेयकांची वसुली पूर्ण होईल का ? हे स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे.

उंदराचा जीव !

एका अर्थी मुक्या प्राण्यांचा विचार केला जाऊ लागला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे; मात्र असा विचार केवळ सोयीनुसार कुणी करत असेल, तर तो दांभिकपणाच म्हणायला हवा.