कोकणरेल्वे मार्गावर धावणार ४ विशेष गाड्या !

मुंबई – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे विभागाने कोकण रेल्वे मार्गावर ४ हिवाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोकणात जाणार्‍या पर्यटकांची संख्या पुष्कळ वाढली आहे. डिसेंबरच्या  अखेरीस असलेला ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठी गोवा राज्याकडे जाणार्‍या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आरक्षण ४ डिसेंबरपासून रेल्वे स्थानकातील सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ‘ऑनलाईन पोर्टल’वर उपलब्ध होणार आहे.