‘नैतिक पोलीस’ (मोरॅलिटी पोलिसिंग) बंद करण्याची सरकारची घोषणा

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाला यश

प्रतिकात्मक छायाचित्र

तेहरान (इराण) – इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाला यश मिळाले आहे. इराणच्या सरकारने नैतिक पोलीसगिरी (मोरॅलिटी पोलिसिंग) बंद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या पोलिसांकडूनच हिजाब न घालणार्‍यांवर कारवाई केली जात होती.

१. ‘या पोलिसांचा न्यायपालिकेशी कोणताही संबंध नसल्याने ती शाखा बंद करण्यात येत आहे’, अशी घोषणा अ‍ॅटर्नी जनरल महंमद जफर मोंताजेरी यांनी केली. तसेच हिजाबच्या अनिवार्यतेशी संबंधित जुनाट कायद्याचे पुनरावलोकन करण्याचे संकेतही दिले आहेत.

२. इराणमध्ये हिजाब परिधान करणे महिलांसाठी बंधनकारक आहे. हिजाब व्यवस्थित परिधान न केल्यावरून तेहरानच्या मोरॅलिटी पोलिसांनी महसा अमीन या तरुणीस कह्यात घेतले होते. ३ दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

३. या पोलिसांना इराणमध्ये ‘गश्त-ए-इरशाद’ म्हणतात. वर्ष २००६ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महंमद अहमदीनेजाद यांनी त्याला प्रारंभ केले होते. इराणमध्ये वर्ष १९८३ पासून हिजाब परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.