कॅनडामध्ये वर्ष २०२१ मध्ये १० सहस्रांहून अधिक लोकांनी घेतले इच्छामरण !

प्रतिकात्मक छायाचित्र

ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये नागरिकांना इच्छामरणाची अनुमती आहे. त्यामुळे वर्ष २०२१ मध्ये १० सहस्रांहून अधिक लोकांनी इच्छमरणाद्वारे प्राण सोडला आहे. ही संख्या कॅनडात या वर्षांत झालेल्या एकूण मृत्यूंच्या ३० टक्के आहे. आता सरकार मार्च २०२३ पासून मानसिकदृष्ट्या आजारी असणार्‍या लोकांनाही कायद्याद्वारे इच्छामरणाची अनुमती देणार आहे. यात अल्पवयीन लोकांचाही समावेश असणार आहे.

१. वर्ष २०१५ मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर कॅनडात इच्छामरणाचा मार्ग मोकळा झाला. पुढील वर्षी २०१६ मध्ये कायदा झाला आणि १८ वर्षावरील लोक कोणत्याही अडचणीमुळे निराश असतील. त्यांना इच्छामरणाची अनुमती दिली जाते.

२. ‘द डीप प्लेसेस : ए मेमोएर ऑफ इलनेस अँड डिस्कव्हरी’ या पुस्तकाचे लेखक रॉस दौतहत यांनी मोठ्या प्रमाणात होणार्‍या इच्छामरणाविषयी सांगितले की, एका वर्षात १० सहस्र लोक इच्छामरण स्वीकारत असतील, तर इच्छामरणाला अनुमती असणे, हे कोणत्याही निकोप नागरी समाजाचे प्रतीक होऊ शकत नाही. उलट तेथे दहशतीचे राज्य असते.

३. कॅनडातील बहुतांश लोक इच्छामरणाचे समर्थन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सन्मानाने जगण्यासोबत सन्मानाने मरणेही माणसाचा हक्क आहे.

४. ‘असोसिएटेड प्रेस’च्या मारिया चेंग त्यांच्या वृत्तामध्ये म्हणतात की, कॅनडात आरोग्य कर्मचारी आर्थिक तंगीमुळे त्रस्त असल्याने आत्महत्येचा विचार करणार्‍यांना इच्छामरणाचा सल्ला देतात.

संपादकीय भूमिका

  • इच्छामरण स्वीकारल्याने त्या व्यक्तीचे ज्यांच्याशी देवाण-घेवाण हिशोब आहेत, ते न फेडताच आयुष्य संपवले जाते. ही स्वेच्छा असून ते निसर्गनियमात ढवळाढवळ करण्यासारखे आहे. त्यामुळे हिंदु धर्मशास्त्रात इच्छामरणाला स्थान नाही. केवळ उन्नत आणि संत हे त्यांचे जीवनकार्य संपल्यानंतर समाधी किंवा अन्य मार्गांनी आयुष्याला पूर्णविराम देतात, हेही येथे लक्षात घ्यायला हवे !
  • कॅनडा येथील कथित सुधारणावादी समाज आणि सरकार यांना अध्यात्मशास्त्र ज्ञात नसल्यामुळे तेथे इच्छामरणाला स्थान आहे. अशाने ते नागरिकांची आध्यात्मिक स्तरावर हाती करत आहेत !