संभाजीनगर येथे १०५ जणांना गोवर !

संभाजीनगर – मुंबई, भिवंडीपाठोपाठ शहरात गोवरच्या संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ४ डिसेंबर या दिवशी शहरातील आकडा १०० च्या वर गेला असून गोवर झालेल्या संशयित बालकांची संख्या आता १०५ पर्यंत पोचली आहे.  शहरात गोवर झपाट्याने वाढल्याने पालकांची चिंता वाढली आहे. गोवरचे रुग्ण आढळून आलेल्या भागात ५ डिसेंबर या दिवशी अतिरिक्त ९ लसीकरण शिबिरे भरवण्यात आली होती.