चंदगड (जिल्हा कोल्हापूर) – वक्फ कायद्यामध्ये काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत. मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र या ‘वक्फ कायद्या’च्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीसुद्धा सहज बळकावता येते. हा देशभरात कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला ‘लँड जिहाद’च आहे. हा धार्मिक भेदाभेद करणारा, राज्यघटनाविरोधी काळा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी चंदगड येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ३१ ऑक्टोबरला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
या प्रसंगी वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. विश्वनाथ पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘हिंदूंवर होणार्या अत्याचारांसाठी हिंदूंनी संघटित होऊन त्याला वाचा फोडली पाहिजे’, असे आवाहनही त्यांनी केले. आंदोलनानंतर नायब तहसीलदार हेमंत कामत यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात श्रीराम सेना, हिंदु राष्ट्र सेना, वारकरी संपद्राय, शिवसेना, हिंदु जनजागृती समिती यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. या प्रसंगी इंग्लंडमधील शांतताप्रिय हिंदु समाजाच्या विरोधात खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
कोल्हापूर – या मागणीसाठी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांनी स्वीकारले. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. देवेंद्र रासकर, श्री. चंद्रकांत बराले, राज्य संघटक श्री. नंदकुमार घोरपडे, प्रदेश समन्वयक श्री. संजय कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ श्री. बंडा पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, श्री. बाबासाहेब भोपळे आणि श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.