मालखेड (अमरावती) येथे मालगाडीचे २० डबे घसरले !

या अपघातामुळे ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १२ रेल्‍वेगाड्या रहित करण्‍यात आल्‍या आहेत, तर इतर गाड्यांचा मार्ग वळवण्‍यात आला आहे. सध्या रेल्वेकडून बचावकार्य चालू आहे. रेल्वे मार्ग अद्याप पूर्ववत् झालेला नाही.

(म्हणे) ‘ग्रहण अशुभ नसते, यामुळे गरोदर महिलांना ग्रहण पाळायची सक्ती करू नका !’

हिंदूंचा बुद्धीभेद करून अधर्माचरणाकडे नेऊ पहाणार्‍या अंनिसवर बंदी का घालू नये ? असे जनतेला वाटते !

नागपूर येथे जाब विचारला म्हणून गर्भवती महिलेला रुग्णालयाच्या प्रभागातून हाकलले !

गर्भवतीची वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उघड्यावर प्रसूती !

कळंबोली (नवी मुंबई) येथील ‘गौरव क्लासेस’ या शिकवणीवर्गात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागृती व्याख्यान

या वेळी वर्तक सर यांनी ‘स्वतःचे रक्षण कसे करावे’ आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा उद्देश याविषयी सांगितले. हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांत सहभागी होऊन वर्तक सर विद्यार्थ्यांनाही नेहमी त्यात सहभागी करून घेत असतात.

हिंदु देवस्थानाच्या भूमी घोटाळाप्रकरणी भूखंड माफियांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्याचे संभाजीनगर खंडपिठाचे आदेश !

जिल्ह्यात हिंदु देवस्थानाच्या भूमीची अवैध हस्तांतरणाची ८ प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण विशेष अन्वेषण पथकाकडे सोपवण्यात आले होते; मात्र पथकाने अहवाल दिल्यानंतरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी संभाजीनगर खंडपिठात धाव घेतली.

पिंपरी-चिंचवड (पुणे) पोलिसांच्या वाहनांसाठी २ कोटींचा निधी !

शहर पोलीस दलासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने राज्यातील पोलीस भरतीत २०० जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भरण्यात येतील.

पुणे जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींचा ‘वित्त आयोगा’च्या निधीचा शून्य व्यय !

देशातील ग्रामपंचायतींना केंद्र सरकारच्या वतीने आपापल्या गावांच्या विकासासाठी वित्त आयोगाचा निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

अमरावती येथील आमदार रवी राणा यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद !

आमदार रवी राणा यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी, तसेच त्यापूर्वी आणि नंतरही विविध ठिकाणी आपल्याविषयी खोटी, अपर्कीतीकारक, बनावट आणि चारित्र्यहनन करणारी जाहीर वक्तव्ये केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

‘राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारत’ यांसाठी २८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांचे सांगली येथे शिबिर ! – जनकल्याण समिती

भारताच्या ईशान्य राज्यांमधील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून ‘राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारत’, यांसाठी २८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विश्रामबाग येथील श्री कांतीलाल शहा प्रशाला येथे पूर्वांचल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,

‘श्री महालक्ष्मी अन्न छत्र सेवा ट्रस्ट’च्या वतीने गरजूंना दीपावली फराळाचे विनामूल्य वाटप !

‘श्री महालक्ष्मी अन्न छत्र सेवा ट्रस्ट’च्या वतीने नेहमीच गरजवंतांना साहाय्य करण्यात येते. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर जे गरीब आर्थिक परिस्थितीमुळे दीपावली साजरी करू शकत नाहीत, अशा ७५० गरीब आणि गरजूंना ३ सहस्र किलो फराळाचे विनामूल्य वाटप करण्यात आले.