मालखेड (अमरावती) येथे मालगाडीचे २० डबे घसरले !

  • ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम 

  • १२ रेल्‍वेगाड्या रहित

अमरावती – नागपूर-भुसावळ मार्गावरील मालखेडनजीक कोळशाच्‍या मालगाडीचे २० डबे २३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री रुळावरून घसरले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही; पण या अपघातामुळे ५६ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १२ रेल्‍वेगाड्या रहित करण्‍यात आल्‍या आहेत, तर इतर गाड्यांचा मार्ग वळवण्‍यात आला आहे. सध्या रेल्वेकडून बचावकार्य चालू आहे. रेल्वे मार्ग अद्याप पूर्ववत् झालेला नाही.