नवी मुंबई – कळंबोली येथील ‘गौरव क्लासेस’ या शिकवणीवर्गात १० वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना संतोष वर्तक सर यांच्या पुढाकाराने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शौर्य जागृती व्याख्यान आयोजित केले होते. कु. शीतल चव्हाण यांनी हे व्याख्यान घेतले. या वेळी स्वसंरक्षणाविषयीची प्र्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पावसकर यांनी ‘धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण ही काळाची आवश्यकता कशी आहे’, हे उदाहरणासह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या वेळी वर्तक सर यांनी ‘स्वतःचे रक्षण कसे करावे’ आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा उद्देश याविषयी सांगितले. हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांत सहभागी होऊन वर्तक सर विद्यार्थ्यांनाही नेहमी त्यात सहभागी करून घेत असतात.
या वेळी प्रती सप्ताह स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच नोव्हेंबर मासात कळंबोली येथे धर्मजागृती सभा घेण्याचे ठरवण्यात आले.