निधर्मी पक्षांच्या प्रचाराचा सामना करण्यासाठी भाजपद्वारे ३ लाख मुसलमान कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार !

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची सिद्धता करण्यास आतापासूनच प्रारंभ केला आहे. निधर्मी पक्षांच्या प्रचाराचा सामना करण्यासाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे.

वनोजा (जिल्हा वाशिम) येथील संत गजानन महाराज मंदिरात चोरी !

जिल्ह्यातील वनोजा येथील संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटीतून अज्ञात चोरट्याने ५० सहस्र रुपये पळवले. ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली असून ती २३ ऑक्टोबरच्या रात्री १.१५ वाजता घडली.

हलाल सक्तीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांचे ठाणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

भारतात हलालच्या माध्यमातून समांतर इस्लामी अर्थव्यवस्था उभी करण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्याविरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांनी हलाल सक्तीच्या विरोधात अभियान आरंभले आहे.

पुणे येथे रेल्वे अधिकार्‍याला सक्तमजुरीची शिक्षा !

बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या तत्कालीन वरिष्ठ अभियंत्याला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि दोन लाख रुपये दंड भरण्याची शिक्षा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने सुनावली. सत्यजित दास (वय ६३ वर्षे) असे शिक्षा झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे.

नागपूर येथे ‘स्वाइन फ्ल्यू’मुळे ४ जणांचा मृत्यू !

नियंत्रणात आलेल्या ‘स्वाइन फ्ल्यू’ आजाराने जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले आहे. ‘स्वाइन फ्ल्यू’मुळे ४ जणांचा मृत्यू झाल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. येथील महापालिकेत झालेल्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत आणखी ४ मृत्यू ‘स्वाइन फ्ल्यू’ने झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.

सातारा येथील सदरबझार परिसरातील गोमांस विक्री करणार्‍या उपाहारगृहांवर बंदी घाला ! – परिसरातील नागरिकांची मागणी

सदरबझार परिसरात अजूनही चोरून जनावरांची हत्या केला जात असून जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी सदरबझारच्या या अनधिकृत पशूवधगृहांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

स्वागतार्ह निर्णय !

वास्तविक हा निर्णय पुष्कळ आधी व्हायला हवा होता; पण विलंबाने का होईना तो घेतला, हेही नसे थोडके ! खरेतर सरकारने विद्यार्थ्यांचा पाया, म्हणजे प्राथमिक शिक्षणातच मातृभाषा भरभक्कमपणे रुजवली, तर त्यांच्या आयुष्याची इमारतही अधिक मजबूत होईल. त्या दिशेनेही सरकारने पावले उचलावीत, ही अपेक्षा !

सत्तेची चिनी वाट !

भारताने चीन आणि जिनपिंग यांना समजेल अशा भाषेत धडा शिकवणेही आवश्यक आहे. त्यासाठी चीनच्या मालावर सरकारने कठोर निर्बंध आणणे आणि भारतियांनी थेट बहिष्कार घालणे. नाक दाबून तोंड उघडते आणि चीनलाही हीच भाषा समजते, हे सरकारने आता तरी लक्षात घ्यावे !

नागपूर येथे शिकवणीवर्ग शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग !

शहरातील हनुमाननगर येथील माहेश्वरी मँथ शिकवणीचे संचालक शिक्षक अरविंद माहेश्वरी (वय ५२ वर्षे) यांनी गणिताचा सराव घेण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. ही घटना ऑक्टोबर मासाच्या पहिल्या आठवड्यात घडली.

हिंदूंनो, याचा वैध मार्गाने विरोध करा !

गोव्यातील हिंदूंवर इन्क्विझिशन (धर्मच्छळ) लादलेला फ्रान्सिस झेवियर याचे शालेय पाठ्यपुस्तकांमधून उदात्तीकरण चालू असल्याचे एका विद्यालयाच्या इयत्ता ६ वीच्या हिंदी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नामुळे समोर आले आहे.