वर्धा येथील परिवहन विभागाच्या पडताळणी मोहिमेत ५३ वाहने दोषी !

६ सहस्र रुपये दंड वसूल

वर्धा – प्रवाशांचा प्रवास वाहनांतून सुरक्षित होण्यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची पडताळणी मोहीम राबवण्यात येत आहे. ११ दिवसांच्या मोहिमेत इतर जिल्ह्यांसह वर्धा जिल्ह्यातील तब्बल ५३ वाहने दोषी आढळली असून त्यांच्याकडून ६ सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १३० वाहने आणि इतर जिल्ह्यांतील ८६ अशा २१६ वाहनांची पडताळणी करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात मध्यरात्री नाशिकजवळ ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत अनेकांचा नाहक बळी गेला होता. शासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमावली देण्यात आलेली असूनही त्यांची पायमल्ली होत असल्याने अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे.