सातारा येथे भाजपकडून शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या विरोधात ‘जोडे मारा आंदोलन’ !

सातारा, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी भगवद्गीतेचा संदर्भ देत भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याविषयी अयोग्य विधाने केली. याचा निषेध करत सातारा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर (पोवईनाका येथे) पाटील यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा आंदोलन’ केले.

या वेळी शिवराज पाटील आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी विकास गोसावी म्हणाले, ‘‘भगवद्गीता हा हिंदूंसाठी पूजनीय ग्रंथ आहे. शिवराज पाटील यांनी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याविषयी काढलेले अनुद्गार काँग्रेसची मानसिकता दर्शवते. पाटील आणि काँग्रेस यांच्या सडक्या विचारसरणीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.’’