‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला ! – श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांची मागणी

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या रामायणावर आधरित चित्रपटाचा टीझर (चित्रपटाचा संक्षिप्त भाग) प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर टीका होत आहे. याविषयी आता अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनीही टीका करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

जलपायगुडी येथे दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन चालू असतांना पूर आल्याने १० जणांचा मृत्यू

अजून काही जण बेपत्ता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

दसर्‍याच्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची रथारूढ रूपात पूजा !

दसर्‍याच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी मंदिरासह, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

चीन सागरातील नोरू चक्रीवादळामुळे भारतातील २० राज्यांत जोरदार पावसाची शक्यता !

यात उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला ठेचले जाईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शिवसेना राष्ट्रभक्तांची आहे. भारतात राहून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा देणार्‍या पिलावळींना ठेचून काढले जाईल. देशाची एकात्मता आणि अखंडता यांना नख लावण्याचा प्रयत्न केला, तर खपवून घेतले जाणार नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप !

प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला, तर दुसरीकडे बीकेसी मैदानात (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला.

भाजपची साथ सोडली म्हणून हिंदुत्व सोडलेले नाही ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेना आणि भाजप या पक्षांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचे ठरले होते, हे मी शपथ घेऊन सांगतो. भाजपने पाठीत वार केला. त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती.

म्हणे सर्वधर्मसमभाव !

‘बालवाडीतील मुलगा आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला तरुण यांचे शिक्षण सारखेच आहे’, असे आपण म्हणत नाही. तशीच स्थिती इतर तथाकथित धर्म आणि हिंदु धर्म यांच्यात असतांना ‘सर्वधर्मसमभावा’चा घोष करणे, यासारखे दुसरे अज्ञान नाही. ‘प्रकाश आणि अंधार समान आहेत’, असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे ‘सर्वधर्मसमभावी’ झाले आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बिहार राज्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला अधिवक्ता, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक आणि मंदिर विश्वस्त यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बिहार राज्यातील सारन, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गया, पाटलीपुत्र, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ पार पडले, त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .