कोल्हापूर, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – दसर्याच्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची रथारूढ रूपात पूजा साकारण्यात आली होती. प्रत्येक जीव स्वतःच्या अशा काही मर्यादा घालून घेत असतो. प्रयत्न केला, तर त्या मर्यादा ओलांडून प्रगतीचे नवे शिखर साध्य करता येते याचा संदेश देणारा उत्सव म्हणजे विजयादशमी ! सिमोल्लंघनाची इच्छा प्रत्येकाची असते; पण त्यासाठी योग्य दिशा आणि पाठिंब्याची आवश्यकता असते. बंधन झुगारण्यासाठी एका समर्थ शक्तीची आवश्यकता असते, ती शक्ती म्हणजे विजयाची शाश्वती आणि असा नित्य शाश्वत विजय जिला शक्य आहे, अशी एकमेव शक्ती म्हणजे जगदंबा होय. भक्त भाविकांना मार्ग दाखवण्यासाठी स्वतः असीम महालक्ष्मी रथारूढ होऊन शिलंगणाला सजली आहे.
अन्य विशेष घडामोडी
दसर्याच्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी मंदिरासह, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.