महंमद शमी यांनी दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्याने त्यांच्या धर्मबांधवांकडून टीका

क्रिकेटपटू महंमद शमी

नवी देहली – भारताचा वेगवान गोलंदाज असणारे क्रिकेटपटू महंमद शमी यांनी ट्वीट करून हिंदूंना दसर्‍यानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे सामाजिक माध्यमांतून त्यांच्या धर्मबांधवांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांना त्यांचे नाव पालटण्याचाही सल्ला दिला आहे. दुसरीकडे शमी यांच्या ट्वीटला ४० सहस्र लोकांनी समर्थन दिले आहे. शमी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये प्रभु श्रीरामांचे चित्रही पोस्ट केले होते.

‘दसर्‍याच्या या पवित्र सणावर, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश येवो, हीच माझी भगवान श्रीरामाकडे प्रार्थना आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसर्‍याच्या खूप खूप शुभेच्छा’, असे शमी यांनी ट्वीट केले होते.

संपादकीय भूमिका

आता निधर्मीवादी का बोलत नाहीत ?