जलपायगुडी येथे दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन चालू असतांना पूर आल्याने १० जणांचा मृत्यू

जलपायगुडी (बंगाल) – येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी ५ ऑक्टोबरला रात्री ९ च्या सुमारास माल नदीच्या काठावर मोठ्या संख्येने भाविक गोळा झाले होते. येथे विसर्जनासाठी ४० मूर्ती आणण्यात आल्या होत्या. तेव्हा अचानक नदीला पूर आला. यामध्ये अनेक जण वाहून गेले. आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अजून काही जण बेपत्ता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

या पुराच्या घटनेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले आहेत. येथे साहाय्यकार्य चालू आहे. नदीला अचानक पूर कसा आला, याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.