गोवा : अमली पदार्थ तस्कराकडून लाच घेणारे २ पोलीस निलंबित

गोव्यातील अमली पदार्थांचा व्यवसाय कारवाईनंतरही आटोक्यात का येत नाही ? हे पुन्हा एकदा उघड झाले ! कुंपणच शेत खात असेल, तर गोव्याला लागलेला ‘अमली पदार्थांचे ठिकाण’ हा ठपका कधीतरी पुसला जाईल का ?

धर्मातील आश्रमप्रणालीचा अर्थ !

‘हिंदु धर्मात ‘वर्णाश्रम’, म्हणजे वर्ण आणि आश्रम ही जीवनपद्धत सांगितली आहे. त्यातील वर्ण म्हणजे जात नव्हे, तर साधनेचा मार्ग. आश्रम चार आहेत. त्याचे महत्व हे की, ‘जीवनाच्या चारही टप्प्यांत आश्रमवासियाप्रमाणे जीवन जगावे’, याची आठवण करून देणे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आगरा (उत्तरप्रदेश) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून लाल किल्ल्यापर्यंत दुर्गामाता दौड

हिंदूंमध्ये विशेषतः युवकांमध्ये शौर्य अन् भक्तीचे जागरण व्हावे; म्हणून ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी नवरात्रीमध्ये ९ दिवस ‘दुर्गामाता दौडी’चे आयोजन केले जाते.

मुंबई विमानतळावरील विमान बाँबद्वारे उडवण्याची धमकी !

सोमालिया देशातून हा संदेश पाठवण्यात आला होता. धमकीच्या ईमेलनंतर स्थानिक पोलिसांसह आतंकवादविरोधी पथक, बाँबशोधक आणि नाशक पथक यांनी विमानाची पडताळणी केली.

प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन ‘हलाल जिहाद’ला विरोध करणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

२८ सप्टेंबरला ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने हॉटेल उदय भवन येथे ‘हलाल जिहाद’वर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र’ यावर विशेष परिसंवाद !

या परिसंवादामध्ये हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदु राष्ट्र आणि हलाल जिहाद’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या परिसंवादामध्ये विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

लातूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी घेतली श्री अंबामातेच्या मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा ! 

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानांतर्गत २७ सप्टेंबर या दिवशी येथील गंजगोलाईमधील श्री अंबामातेच्या मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली.

नागपूर येथे ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चे १० गुन्हे नोंद !

लहान मुलांच्या अश्लील चित्रफितींव्यतिरिक्त मुले अंघोळ करतांना, तसेच त्यांचे अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्र अथवा व्हिडिओ काढणे, ते प्रसारित करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आयुक्तालयांतर्गत यावर्षी आतापर्यंत एकही गुन्हा नोंद झालेला नाही.

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून धर्मशिक्षणच हिंदू मुलींना वाचवेल ! – श्रीमती अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त लातूर येथे व्याख्यान