आंतरराष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे विशेष लक्ष !
(‘चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणजे लहान मुलांचे अश्लील छायाचित्र अथवा चित्रफीती करून ते विविध माध्यमांतून समाजात प्रसारित करून पैसे कमावणे)
नागपूर – लहान मुलांची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफीती प्रसारित केल्याप्रकरणी जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात १० गुन्हे नोंद झाले आहेत. यात ६ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. गजानन रंगारी आणि ओम बांबल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. हे रोखण्यासाठी केंद्रासह आंतरराष्ट्रीय अन्वेषण यंत्रणाही सक्रीय झाल्या आहेत. नागरिकांच्या सामाजिक माध्यमांवरील खात्यांवर या यंत्रणांचे लक्ष आहे. मुलांचे अश्लील छायाचित्र वा चित्रफीत प्रसारित केल्यास संबंधित व्यक्तीला पोलीस कोठडी मिळू शकते.
लहान मुलांच्या अश्लील चित्रफितींव्यतिरिक्त मुले अंघोळ करतांना, तसेच त्यांचे अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्र अथवा व्हिडिओ काढणे, ते प्रसारित करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आयुक्तालयांतर्गत यावर्षी आतापर्यंत एकही गुन्हा नोंद झालेला नाही.
संपादकीय भूमिका‘चाईल्ड पोर्नोग्राफी’शी संबंधित असणार्यांना कठोर शिक्षा केल्यासच अशा प्रकारांना आळा बसेल ! |