प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन ‘हलाल जिहाद’ला विरोध करणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

 

उपस्थित कार्यकर्ते

बेळगाव – आज फॅशन उद्योगामध्ये हलाल प्रमाणपत्र आहे. ‘डेटिंग’ संकेतस्थळे, ‘मायक्रोव्हेव’सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, निवासी इमारत, रुग्णालये हलाल प्रमाणित होत आहेत. एवढेच नाही, तर ‘हलाल पर्यटन’ नावाचा नवीन प्रकार बनत चालला आहे. तरी प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन ‘हलाल जिहाद’ला विरोध करून हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते २८ सप्टेंबरला ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने हॉटेल उदय भवन येथे ‘हलाल जिहाद’वर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.