धर्मातील आश्रमप्रणालीचा अर्थ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदु धर्मात ‘वर्णाश्रम’, म्हणजे वर्ण आणि आश्रम ही जीवनपद्धत सांगितली आहे. त्यातील वर्ण म्हणजे जात नव्हे, तर साधनेचा मार्ग. आश्रम चार आहेत – १. ब्रह्मचर्याश्रम, २. गृहस्थाश्रम, ३. वानप्रस्थाश्रम आणि ४. संन्यासाश्रम. त्यांचा अनुक्रमे अर्थ आहे – १. ब्रह्मचर्यपालन, २. गृहस्थजीवनाचे पालन, ३. गृहस्थाश्रमाचा त्याग करून मुनीवृत्तीने वनात रहाणे आणि ४. संन्यासजीवनाचे पालन. या चारही शब्दांना ‘आश्रम’ हा शब्द जोडण्याचे महत्त्व हे की, ‘जीवनाच्या चारही टप्प्यांत आश्रमवासियाप्रमाणे जीवन जगावे’, याची आठवण करून देणे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले