‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून धर्मशिक्षणच हिंदू मुलींना वाचवेल ! – श्रीमती अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त लातूर येथे व्याख्यान

लातूर, २ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून हिंदु मुलींना वाचवायचे असल्यास त्यांना धर्मशिक्षण देऊन धर्माचरण करण्यास शिकवणे, हा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या महिला संघटक श्रीमती अलका व्हनमारे यांनी केले. २८ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त हिंदु राष्ट्र-संकल्प अभियानाच्या अंतर्गत ‘हिंदु स्त्री संस्कृती आणि नारी रक्षण’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.

व्यासपिठावर बोलतांना श्रीमती अलका व्हनमारे आणि ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ दाखवतांना सौ. राजश्री देशमुख

येथील बालाजी मंदिराच्या सत्संग भवन येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुष्कळ अधिक महिलांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचा उद्देश समितीच्या सौ. राजश्री देशमुख यांनी सांगितला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती साळोखे यांनी केले.