दुष्टांचे दमन आणि सुष्टांचे (सज्जनांचे) संरक्षण करणारी श्री दुर्गादेवी !
‘आश्विन शुक्ल ८, हा दिवस भारतात दुर्गाष्टमी म्हणून पाळण्यात येतो. जगात जेव्हा आसुरी वृत्ती प्रबळ होते, तेव्हा आदिशक्ती देवीरूपाने अवतीर्ण होऊन असुरांचा संहार करते, असा भारतीय जनतेचा विश्वास आहे. आदिमायेने अनेक अवतार घेतले असल्यामुळे तिला अनेक नावे प्राप्त झाली आहेत.