कारागृहातील बंदीवानांची संख्या अल्प करण्यासाठी ‘रिलीज यू.टी.आर्.सी. @ ७५’ हा उपक्रम राबवणार !

कारागृहातील बंदीवानांची संख्या अल्प करण्यासाठी उपक्रम राबवण्यासमवेत गुन्हेगार निर्माण होऊ नयेत, यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, हाच एकमेव उपाय आहे.

पुणे जिल्ह्यातील सधन शेतकर्‍यांनी लाटले अल्पभूधारकांचे अनुदान !

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेत अल्प भूधारक शेतकर्‍यांना देण्यात येणारा लाभ (अनुदान) प्राप्तीकर भरणार्‍या शेतकर्‍यांनी घेतला. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शेतकर्‍यांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आताच संघटित होणे आवश्यक ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

पुढील फाळणी टाळण्यासाठी आताच संघटित होणे आवश्यक आहे. फाळणीचा इतिहास कदापीही विसरू नये, इतिहास विसरणार्‍यांना इतिहास घडवता येत नाही, त्यांचे अस्तित्वही इतिहासजमा होते. एकतर्फी लांगूलचालन करून, त्यांचे तुष्टीकरण करून तृप्त होता येत नाही

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची ‘प्लेसमेंट’ची टक्केवारी घसरली !

विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये ‘प्लेसमेंट विभाग’ (योग्य व्यक्तीस नोकरी देणे) वर्ष २०१७ मध्ये चालू करण्यात आला आहे. तेव्हापासून आतापर्यंत केवळ १ सहस्र ८८८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे.

पोलिसाच्या पत्नीवर अत्याचार करणारा हवालदार निलंबित !

पोलीस कर्मचार्‍याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी पोलीस हवालदारावर विनयभंगाचा गुन्हा नोंद करून त्याला निलंबित करण्यात आले आहे. सचिन सणस असे हवालदाराचे नाव आहे. सणस याला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले.

प्रभागसंख्या वाढवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय चुकीचा होता ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई महापालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यांत आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक क्रमांक १९ विधान परिषदेत मांडण्यात आले.

१९ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन !

राज्य विधीमंडळाच्या अवघ्या ६ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचे २५ ऑगस्ट या दिवशी सूप वाजले. (अधिवेशनाची सांगता झाली.) पुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबरपासून चालू होणार आहे, असे विधानसभा येथे अध्यक्ष आणि विधान परिषद येथे सभापती यांनी घोषित केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या शौर्याचा जागर

याप्रसंगी विविध फलकांच्या माध्यमातून क्रांतीकारकांचा शौर्यशाली इतिहास समाजासमोर सांगितला गेला. याचा लाभ एकूण ५५० जणांनी घेतला.

न्यायव्यवस्थेला ऊर्जितावस्था यावी !

नवनिर्वाचित सरन्यायाधिशांकडून पालटांची अपेक्षा करता येऊ शकते; कारण ‘लहान मुले जर सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश आणि अधिवक्ते सकाळी ९ वाजता काम का चालू करू शकत नाहीत ?’ असा प्रश्न त्यांनी एकदा उपस्थित केला होता ! त्यांना शुभेच्छा !

पिंपरी (पुणे) येथील शाळा व्यवस्थापनांच्या हलगर्जीपणामुळे सहस्रो विद्यार्थी लाभांपासून वंचित !

शासनाने केवळ विद्यार्थ्यांसाठी योजना देऊन न थांबता त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचतात का ? याकडेही लक्ष द्यावे.