परभणी – पुढील फाळणी टाळण्यासाठी आताच संघटित होणे आवश्यक आहे. फाळणीचा इतिहास कदापीही विसरू नये, इतिहास विसरणार्यांना इतिहास घडवता येत नाही, त्यांचे अस्तित्वही इतिहासजमा होते. एकतर्फी लांगूलचालन करून, त्यांचे तुष्टीकरण करून तृप्त होता येत नाही, उलट त्याची भूक सदैव वाढत जाईल; म्हणून तुष्टीकरणापेक्षा आपण जागृत होऊन संघटितपणे त्याला तोंड दिले पाहिजे, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी येथील वैष्णवी मंगल कार्यालयात व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने दोन दिवसांच्या कीर्तन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आफळे यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासमवेत देशाच्या फाळणीच्या वेदना आजही जागृत आहेत, असे नमूद केले.