भारतीय महिलांवर वर्णद्वेषी विधाने करणार्‍या अमेरिकी महिलेवर कठोर कारवाई करा !

टेक्सास येथे ४ भारतीय महिलांवर एका अमेरिकी महिलेने काही दिवसांपूर्वी वर्णद्वेषी विधाने केली होती. या प्रकरणी भारतीय वंशांचे अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी या महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हिंदूंना ‘धर्म’ शिकवण्याची आवश्यकता !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांचे हित पहाणार्‍यांनाच मते देतात, तर हिंदू बुद्धीप्रामाण्यवाद, समाजवाद, साम्यवाद इत्यादी निरनिराळ्या विचारसरणींप्रमाणे मते देतात. त्यामुळे त्यांची मते फुटतात. त्यामुळे त्यांना भारतात किंमत उरली नाही ! हिंदूंना धर्म शिकवला, तरच त्यांची मते इतर धर्मियांप्रमाणे एकगठ्ठा होतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून बोगस विद्यापिठांची सूची घोषित !

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील बोगस विद्यापिठांची सूची घोषित केली आहे. त्याअन्वये देशात २१ बोगस विद्यापिठे असून सर्वाधिक बोगस विद्यापिठे राजधानी देहलीत आहेत.

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करून त्याची कठोर कार्यवाही करा ! – प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेला विशेष संवाद : ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’

सोनाली फोगाट हत्या प्रकरणी पाचवा संशयित पोलिसांच्या कह्यात !

हॉटेलचा कर्मचारी तथा संशयित दत्तप्रसाद गावकर याला रामदास मांद्रेकर यानेच मेथाफेटामाईन (एम्.एम्.डी.ए.) हे घातक अमली पदार्थ पुरवले होते, असे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे. रामदास मांद्रेकर याने गुन्ह्यांची स्वीकृती दिल्याची माहिती हणजुणे पोलिसांनी दिली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे !

मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जनतेला शिस्त लावणे आवश्यक !

गणेशोत्सव विसर्जन व्यवस्थेसंदर्भात वसई-विरार महापालिका आयुक्तांना शिवसेना युवासेनेच्या वतीने निवेदन !

गणेशमूर्तींचे तलावांमध्ये विसर्जन करण्यास अनुमती देण्याची मागणी

‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणात रवाना

गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत २८ ऑगस्ट या दिवशी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने १ सहस्र ८०० चाकरमानी रवाना झाले. मुंबई भाजपाच्या वतीने खास कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी विनामूल्य ‘मोदी एक्स्प्रेस’ या रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

संकेतस्थळावर तक्रार प्रविष्ट करण्याची सुविधा बंद ठेवून नागरिकांना मात्र तक्रार करण्याचे आवाहन !

गणेशोत्सवाच्या कालावधीत भरमसाठ तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून भाविकांची आर्थिक लूट चालू आहे. ‘या विरोधात तक्रार आली, तरच कारवाई करू’, अशी भूमिका घेणार्‍या मोटार वाहन विभागाने संकेतस्थळावर तक्रार करण्यासाठीची सुविधा बंद ठेवली आहे.

फटाके मर्यादित स्वरूपात लावा ! – सुनील देसाई, अध्यक्ष, सदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोंडा

गणेशोत्सव काळात केवळ फोंडा तालुक्यात फटाक्यांवर ५० लक्ष रुपये व्यय (खर्च) केले जातात, तर मग पूर्ण राज्यात किती पैसे खर्च होत असतील ? वर्ष २०१९ मध्ये फोंडा तालुक्यात एकूण ६ ठिकाणी फटाक्यांमुळे भाजण्याच्या  दुर्घटना घडल्या होत्या आणि यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता.