फटाके मर्यादित स्वरूपात लावा ! – सुनील देसाई, अध्यक्ष, सदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोंडा

प्रातिनिधिक छायाचित्र

फोंडा, २८ ऑगस्ट (वार्ता.) – फटाके लावा; पण मर्यादित स्वरूपात, असे आवाहन सदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोंडाचे अध्यक्ष श्री. सुनील देसाई यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘मंडळातील सर्व पदाधिकारी गणेशोत्सवात मर्यादित फटाक्यांचा वापर करण्यावर ठाम आहेत. प्रदूषण टाळणे आणि आगीच्या दुर्घटना टाळणे यांसाठी मंडळांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील इतर मंडळांनी याचे अनुकरण करावे.’’

फोंडा तालुक्यात केवळ फटाक्यांवर ५० लाख रुपये खर्च !

गणेशोत्सव काळात केवळ फोंडा तालुक्यात फटाक्यांवर ५० लक्ष रुपये व्यय (खर्च) केले जातात, तर मग पूर्ण राज्यात किती पैसे खर्च होत असतील ? वर्ष २०१९ मध्ये फोंडा तालुक्यात एकूण ६ ठिकाणी फटाक्यांमुळे भाजण्याच्या  दुर्घटना घडल्या होत्या आणि यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. यामुळे मर्यादित फटाक्यांचा वापर करण्याचे आवाहन अनेक ठिकाणांवरून होत आहे.

संपादकीय भूमिका

हेच पैसे सत्कार्यासाठी वापरल्यास श्री गणेशाचीही कृपा झाली असती !