‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणात रवाना

मुंबई – ‘गणपति बाप्पा मोरया’च्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत २८ ऑगस्ट या दिवशी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने १ सहस्र ८०० चाकरमानी रवाना झाले. मुंबई भाजपाच्या वतीने खास कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी विनामूल्य ‘मोदी एक्स्प्रेस’ या रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी दादर रेल्वे स्थानकातून ‘मोदी एक्सप्रेस’ला हिरवा कंदील दाखवला.

या उपक्रमासाठी मुंबई येथील भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड आणि महामंत्री संजय उपाध्याय यांच्यासह भाजप पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.