धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करून त्याची कठोर कार्यवाही करा ! – प्रबल प्रतापसिंह जुदेव, प्रदेशमंत्री, भाजप, छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेला विशेष संवाद : ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’

मुंबई – ख्रिस्ती मिशनर्‍यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का ? शिक्षण आणि अन्य सेवा यांच्या नावाखाली व्यापार केला जात आहे. आपल्या भारतीय संस्कृतीवर आघात करून नियोजनबद्ध रितीने हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. धर्मांतर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. देशातील अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा लागू केला असला, तरी तो देशभर लागू करून त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक आहे.

श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव

यासाठी देशभरातील हिंदूंनी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन भाजपचे छत्तीसगड प्रदेशमंत्री आणि ‘अखिल भारतीय घरवापसी’चे प्रमुख श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

श्री. विनोद बंसल

देशात होत असलेले धर्मांतर थांबवणे आवश्यक ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद

‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर आहे’, याविषयी कुठलीही शंका असता कामा नये. अखंड भारतापासून अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश हे धर्माच्या आधारावरच वेगळे झाले. जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या घटली, तिथे हिंदू बाटला (धर्मांतरित) गेला. काश्मीर, बंगाल, ईशान्य भारतातील राज्ये, केरळ ही याची उदाहरणे असून तिथे आतंकवादी कारवायांत वाढ झाली आणि तेथील हिंदू अल्पसंख्य झाले. धर्मांतर रोखण्यासाठी अनेक साधू-संतांनी बलीदान दिले आहे. ओडिशा येथील स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांनी धर्मांतर रोखण्ो आणि हिंदूंची घरवापसी करणे, हे महान कार्य करत आपल्या प्राणांचे बलीदान दिले. धर्मांतर थांबवणे पुष्कळ आवश्यक आहे.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की..

🟢 धर्मांतर ही राष्ट्रांतर !

 ______________________________________

श्री. आनंद जाखोटिया

धर्मांतरविरोधी कायदा ही काळाची आवश्यकता ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

‘जेव्हा एका व्यक्तीचे धर्मपरिवर्तन होते, तेव्हा फक्त त्याचे धर्मपरिवर्तन होत नसून आपल्या धर्माच्या विरोधात एक शत्रू म्हणून तो उभा रहातो’, असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते. पूर्वी अखंड असलेला भारत आता विभागला गेला आहे. देशातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. धर्मांतराच्या समस्येने आता व्यापक रूप धारण केले आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जात आहे. देशभर ‘धर्मांतरविरोधी कायदा’ अशा कठोर पद्धतीने लागू करायला हवा की, धर्मांतर करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही. धर्मांतरविरोधी कायदा ही काळाची आवश्यकता आहे.