भारतीय महिलांवर वर्णद्वेषी विधाने करणार्‍या अमेरिकी महिलेवर कठोर कारवाई करा !

अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांची मागणी

टेक्सास (अमेरिका) – येथे ४ भारतीय महिलांवर एका अमेरिकी महिलेने काही दिवसांपूर्वी वर्णद्वेषी विधाने केली होती. या प्रकरणी भारतीय वंशांचे अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी या महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, मी पोलिसांना आवाहन करतो की, आरोपी महिलेवर कायद्यानुसार खटला चालवावा ज्यामुळे तिला धडा मिळेल.