कागदपत्रांच्या पूर्तर्तेअभावी ३३४ निर्वासित हिंदू पाकमध्ये परतले !

पाकिस्तानातील अत्याचारांमुळे तेथील हिंदू भारतात येत असतात; मात्र जुलै २०२२ पर्यंत येथे आलेल्या हिंदूंपैकी ३३४ हिंदू निर्वासित पुन्हा पाकिस्तानात परतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

(म्हणे) ‘कश्मीरप्रश्‍नी युद्ध हा पर्याय नसून आम्हाला शांतता हवी आहे !’ – पाकिस्तानचे पंतप्रधान नक्राश्रू

पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भारताने विश्‍वास न ठेवता त्याच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबणेच आवश्यक आहे !

आम आदमी पक्ष फोडून भाजपमध्ये आल्यास सर्व खटले मागे घेऊ !

भाजपकडून प्रस्ताव आल्याचा देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा दावा

काश्मीरमध्ये अत्याधुनिक स्फोटकांचा साठा जप्त

काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करावे लागेल !

पंजाबमध्ये ५ मासांत १३५ भ्रष्ट अधिकार्‍यांना अटक

अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकार्‍यांची संख्या एवढी असेल, तर अटक न झालेले किती असतील, याचा विचारही न केलेला बरा ! प्रशासन भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाल्याचे हे द्योतक आहे !

मध्यप्रदेशमध्ये टोल देण्यास नकार देत तरुणाची टोल कर्मचारी महिलेस मारहाण

या घटनेचे चित्रण येथील सीसीटीव्हीमध्ये झाले. ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.

बँकांच्या तपासणीतच आढळल्या दोन सहस्र रुपयांच्या १३ सहस्र ६०४ बनावट नोटा !

बनावट नोटा रोखण्यासाठी प्रयत्न करूनही त्या भारताच्या चलनात सापडणे, हे यंत्रणांना लज्जास्पद !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेला २५ ऑगस्टपर्यंत स्थगिती

पाकचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ३ दिवसांचा अंतरिम जामीन संमत केला आहे.

ज्ञानवापी खटल्यातील महिला याचिकाकर्त्यांच्या घराची माहिती काढण्याचा प्रयत्न

या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी याच खटल्यातील पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांनाही ठार मारण्याची धमकी आलेली आहे.

भारतात आत्मघातकी आक्रमणाचा कट रचलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला रशियात अटक !

भारत सरकारने केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील विविध आतंकवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !