पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेला २५ ऑगस्टपर्यंत स्थगिती

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ३ दिवसांचा अंतरिम जामीन संमत केला आहे. त्यामुळे त्यांना २५ ऑगस्टपर्यंत अटक करण्यास स्थगिती देण्यात आली आहे. त्यांच्यावर आतंकवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी इस्लामाबाद येथील सभेत त्यांनी पोलीस आणि न्यायालय यांच्यावर टीका केली होती. त्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.