काश्मीरमध्ये अत्याधुनिक स्फोटकांचा साठा जप्त

पुलवामा – दक्षिण काश्मीरमधील त्राल येथील बेहगुंड परिसरात १० ते १२ किलो वजनाची अत्याधुनिक स्फोटके जप्त करण्यात आली. ‘या स्फोटकांविषयी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात आली. ही स्फोटके हस्तगत केल्यामुळे एका मोठ्या आतंकवादी आक्रमणाचा कट उधळला गेला आहे. ही स्फोटके नष्ट करण्याचा प्रयत्न सेना आणि पोलीस करत आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली. जून २०२२ मध्येही सैनिकांनी १५ किलो अत्याधुनिक स्फोटके जप्त केली होती. त्या वेळी २ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करावे लागेल !