मध्यप्रदेशमध्ये टोल देण्यास नकार देत तरुणाची टोल कर्मचारी महिलेस मारहाण

तरुणाची टोल कर्मचारी महिलेस मारहाण

भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील राजगड पोलीस ठाण्याच्या सीमेमधील एका टोल नाक्यावर काम करणार्‍या महिलेला एका तरुणाने मारहाण केली. या महिलेने आरोपीकडे टोलची मागणी केल्यावर त्याने ‘मी स्थानिक असल्याने टोल देणार नाही’, असे सांगत वाद घातला आणि नंतर शिवीगाळ करत मारहाण केली.

या घटनेचे चित्रण येथील सीसीटीव्हीमध्ये झाले. ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.