(म्हणे) ‘कश्मीरप्रश्‍नी युद्ध हा पर्याय नसून आम्हाला शांतता हवी आहे !’ – पाकिस्तानचे पंतप्रधान नक्राश्रू

डावीकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पंतप्रधान नरेद्र मोदी

इस्लामाबाद – काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. आम्हाला भारतासमवेत असलेला सीमावाद सोडवायचा आहे. आम्हाला कायमस्वरूपी शांतता हवी आहे. पाकिस्तान आणि भारत यांनी व्यापार आणि अर्थकारण या क्षेत्रांमध्ये एकमेकांशी स्पर्धा केली पाहिजे, असे नक्राश्रू पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापिठात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ढाळले. सध्या पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. कंगाल झालेल्या पाकिस्तानला भारताशी युद्ध पेलवणार नाही. त्याचे अर्थकारण सुधारण्यासाठी त्याला भारताशी विविध क्षेत्रांत व्यापार करायचा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शरीफ यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका 

पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर भारताने विश्‍वास न ठेवता त्याच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबणेच आवश्यक आहे !