हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या तरुणाला ‘सर तन से जुदा’ची धमकी देणार्‍या बाबू कुरेशी याला अटक !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात अधिकाधिक असुरक्षित बनत चाललेला हिंदु समाज ! पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंप्रमाणे भारतीय हिंदूंची दुरवस्था होण्याआधीच हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

प्रशांत भूषण यांच्यासारखे अधिवक्ता रशिया अथवा चीन यांसारख्या देशांमध्ये असण्याची कल्पनाही करू शकत नाही !

प्रशांत भूषण यांनी सर्वाेच्च न्यायालयावर केलेल्या टीकेला ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’चे प्रत्युत्तर !

नर्मदा नदीतून आणलेल्या ५ सहस्र १०० शिवलिंगांची पूजा !

श्रावण मासात शहरातील प्रसिद्ध कैलास मठात आयोजित ‘शिवलक्षार्चन’सोहळ्यात ५०० किलोचे मुख्य शिवलिंग आणि त्याच्या आजूबाजूला नर्मदा नदीतून आणलेली ५ सहस्र १०० शिवलिंग स्थापन करण्यात आली असून लक्ष लिंगार्चन प्रतिदिन होत आहे.

मुंबईमध्ये उत्साहाच्या भरात अनेकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान !

स्वातंत्र्यकाळात राष्ट्रध्वज पडू नये, यासाठी क्रांतीकारकांनी गोळ्या झेलल्या. स्वातंत्र्योत्तरकाळात राष्ट्रध्वजाचा अवमान होणे, हे नागरिकांमधील देशप्रेम उणावत चालल्याचे द्योतक आहे ! प्रत्येक भारतियाने क्रांतीकारकांसारखी कृतीशील देशभक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवा !

ऐतिहासिक पन्हाळगडावरील दगड परत पडले !

पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा गडाची सातत्याने पडझड होत आहे. या संदर्भात गडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेणार्‍या ४३७ अधिकार्‍यांना ९ वर्षांत अटक !

शासनाच्या कल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यामध्येच घोटाळा होत असेल, तर याहून दुर्दैवी आणि संतापजनक काय असू शकते ? यातून शासकीय स्तरावर कार्य करणार्‍यांमध्ये भ्रष्टाचार किती मुरला आहे, हे लक्षात येते. अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षाच हवी.

गुजरातच्या धर्तीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भगूर (जिल्हा नाशिक) येथे स्मारक उभारावे ! – सावरकरप्रेमींची मागणी

भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथे सावरकर यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी भगूरकर आणि सावरकरप्रेमी यांनी १३ ऑगस्ट या दिवशी केली.

(म्हणे) ‘ब्राह्मणांची पोरे खारीक-बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुले जांभया देत आहेत !’

जातीयवाद, भ्रष्टाचार आदींमुळे स्वतःचा पक्ष नष्ट होत चालला असूनही जातीयवादी विधाने करणारे काँग्रेसचे उरलेसुरले खासदार पक्षाला बुडवल्याविना रहाणार नाहीत !

नाशिक येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या धाडीत १ कोटी १० लाख ११ सहस्र रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त !

खाद्यतेलाचा लाखो रुपयांचा संशयास्पद साठा होईपर्यंत अन्न आणि औषध प्रशासन काय करत होते ?

वाशी (जिल्हा नाशिक) येथील कलकाम आस्थापनाकडून ३४२ गुंतवणूकदारांची १ कोटींची फसवणूक !

वर्ष २०१३ ते २०२२ या कालावधीत ‘कलकाम रियल इंफ्रा’ आस्थापनात संशयित संचालक आणि त्यांचे दलाल यांनी गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा अधिक टक्के व्याज देण्याचे आमीष देत गुंतवणूक करण्याची योजना दिली.