(म्हणे) ‘ब्राह्मणांची पोरे खारीक-बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुले जांभया देत आहेत !’

काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचा ब्राह्मणद्वेष !

भद्रावती (जिल्हा चंद्रपूर) – राज्याच्या मंत्रीमंडळात भ्रष्टाचारी आणि नालायक लोकांचा समावेश आहे. मंत्री भ्रष्टाचारी असले, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना ‘क्लीन चीट’ दिली आहे. त्यांना मानावे लागेल. जन्माला यायचे असेल, तर ब्राह्मणांच्याच पोटी यावे. आज ब्राह्मणांची पोर खारीक-बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुले जांभया देत आहेत, असे ब्राह्मणद्वेषी वक्तव्य काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केले. काँग्रेसच्या ‘आझादी गौरव यात्रे’निमित भद्रावती येथे १३ ऑगस्ट या दिवशी झालेल्या कार्यक्रमात खासदार धानोरकर बोलत होते. (‘बहुजनांची मुले जांभया देत आहेत’, असे धानोरकर यांना वाटते, तर त्या मुलांनी त्यांचे वागणे स्वतःच पालटायला नको का ? त्यासाठी दुसर्‍यांना पाण्यात पाहून काय उपयोग ?  – संपादक)

संपादकीय भूमिका

  • जातीयवाद, भ्रष्टाचार आदींमुळे स्वतःचा पक्ष नष्ट होत चालला असूनही जातीयवादी विधाने करणारे काँग्रेसचे उरलेसुरले खासदार पक्षाला बुडवल्याविना रहाणार नाहीत !
  • असे म्हणून धानोरकर यांनी बहुजनांचा अवमानच केला आहे !