नाशिक येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या धाडीत १ कोटी १० लाख ११ सहस्र रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त !

नाशिक येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या धाडीत १ कोटी १० लाख ११ सहस्र रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त

नाशिक – तालुक्यातील शिंदे गावाजवळील नायगाव रस्त्यावरील ‘माधुरी रिफायनर्स’ या खाद्यतेलाच्या गोदामावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळयुक्त तेल असल्याच्या संशयावरून धाड टाकून १ कोटी १० लाख ११ सहस्र रुपये किमतीच्या खाद्यतेलाचा साठा जप्त केला.

कारवाईनंतर संबंधित गोदामामधील खाद्यतेलाचे नमुने पडताळण्यासाठी पाठवण्यात आले आहेत, तसेच सध्या अन्न आणि औषध विभाग यांच्या माध्यमातून अन्नसुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती अन् खाद्यतेलाचे नमुने पडताळण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. नाशिक विभागाचे सहआयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अधिकार्‍यांनी विशेष मोहिमेच्या अंतर्गत ही कारवाई केली.

संपादकीय भूमिका

खाद्यतेलाचा लाखो रुपयांचा संशयास्पद साठा होईपर्यंत अन्न आणि औषध प्रशासन काय करत होते ?