नर्मदा नदीतून आणलेल्या ५ सहस्र १०० शिवलिंगांची पूजा !

नाशिक येथे शिवलक्षार्चन सोहळा !

नाशिक येथे शिवलक्षार्चन सोहळा

नाशिक – श्रावण मासात शहरातील प्रसिद्ध कैलास मठात आयोजित ‘शिवलक्षार्चन’सोहळ्यात ५०० किलोचे मुख्य शिवलिंग आणि त्याच्या आजूबाजूला नर्मदा नदीतून आणलेली ५ सहस्र १०० शिवलिंग स्थापन करण्यात आली असून लक्ष लिंगार्चन प्रतिदिन होत आहे. विशेष म्हणजे या शिवलिंग अर्चन सोहळ्यामध्ये १३ ऑगस्ट या दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ही उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमास नाशिकसह राज्यातून भाविक दर्शनासाठी आले आहेत. या सोहळ्याची सिद्धता मठामध्ये स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.

शहरात प्रथमच अशा प्रकारचा सोहळा होत असून प्रतिदिन बेलपत्रासह विविध औषधी फळे, कमळपुष्प, सुकामेवा, कडधान्य, डाळी आणि विविधरंगी पुष्प यांसारख्या १ लाख एवढ्या संख्येत वस्तू अर्पण केल्या जात आहेत. नाशिककरांना प्रतिदिन सकाळी अर्चनासाठी ८ वाजता, तर रात्री ७.३० वाजता आरतीच्या वेळी येथे दर्शन घेता येणार आहे. नवविधा भक्तीमध्ये अर्चनाला अनन्यसाधारण महत्त्व असून या सोहळ्यात प्रतिदिन येथे १ लाख अर्चन केले जाणार आहे. या सोहळ्यात विविध प्रकारची भस्मे, कुंकू आणि अष्टगंधही अर्पण केले जाणार आहे.

‘‘ देश कोरोनामुक्त व्हावा, देशवासियांना चांगले आरोग्य लाभावे, चांगला पाऊस सर्वत्र व्हावा आणि सर्व लोक सुखी व्हावेत’, असा संकल्प या आयोजनामागे आहे’’, आ॑से स्वामी संविदानंद सरस्वती यांनी सांगितले. (अशा प्रकारचा व्यापक संकल्प करून धार्मिक विधी अन्य पंथियांनी केलेले कधी ऐकीवात नाही ! – संपादक)