अध्यक्ष आणि संचालक यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
नाशिक – मैत्रेय आणि समृद्धी आस्थापनानंतर वाशी येथील ‘कलकाम रियल इंफ्रा इंडिया लिमिटेड’ आस्थापनाने गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचे आमीष देत ३४२ गुंतवणूकदारांची १ कोटी १७ लाख २९ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आस्थापनाचे अध्यक्ष आणि संचालक यांसह ८ जणांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात १३ ऑगस्ट या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वर्ष २०१३ ते २०२२ या कालावधीत ‘कलकाम रियल इंफ्रा’ आस्थापनात संशयित संचालक आणि त्यांचे दलाल यांनी गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा अधिक टक्के व्याज देण्याचे आमीष देत गुंतवणूक करण्याची योजना दिली. जिल्ह्यातील ३४२ गुंतवणूकदारांनी आस्थापनामध्ये १० सहस्र ते ३ लाख रुपयांपर्यंत रकमेची गुंतवणूक केली. प्रारंभी संशयितांनी गुंतवणूकदारांना अधिकचा परतावा दिला; मात्र २ वर्षांपासून आस्थापनाचे कार्यालय बंद झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. २ वर्षांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.