ऐतिहासिक पन्हाळगडावरील दगड परत पडले !

पन्हाळगड

पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) – काही दिवसांपूर्वीच पन्हाळगडावरील बुरूजाचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी असतांना संततधार पडणार्‍या पावसामुळे पुन्हा एकदा ४ दरवाजा खाली असलेल्या नाक्याजवळ दगड ढासळले आहेत. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा गडाची सातत्याने पडझड होत आहे. या संदर्भात गडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष !