भीलवाडा (राजस्थान) येथील घटना
(‘सर तन से जुदा’ म्हणजे ‘शिर धडापासून वेगळे’)
भीलवाडा (राजस्थान) – येथील सूरज नावाच्या एका हिंदु युवकाला तो हिंदुत्वनिष्ठ संघटनेत कार्यरत असल्याने जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सोहिद उपाख्य बाबू कुरेशी याने यासंदर्भात सूरजला दोन वेळा संपर्क करून ‘तुला ‘सर तन से जुदा’ची शिक्षा देण्यात येईल’, अशा प्रकारे धमकावले, तसेच त्याचे छायाचित्र ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट करून ‘आता याचा क्रमांक आहे’, अशा प्रकारे लिहिले. सूरजने यासंदर्भात पोलिसात तक्रार प्रविष्ट केल्यावर कुरेशी याला अटक करण्यात आली. कुरेशीकडून भ्रमणभाषसह एक चाकू आणि त्याला धार काढण्यासाठी दगड हस्तगत करण्यात आला आहे.
१. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भीलवाडा येथील आझादनगरमध्ये रहाणार्या सूरजला ५ आणि ७ ऑगस्ट या दिवशी कुरेशीकडून धमक्या मिळाल्या होत्या. कुरेशी म्हणाला होता की, तू हिंदु संघटनेत जाणे सोडून दे अन्यथा उदयपूरच्या कन्हैयालालसारखी तुझी गत केली जाईल. तू माझ्यापासून वाचू शकत नाहीस. तुझे शिर धडापासून वेगळे करूच ! तू आम्हाला ओळखत नाहीस.
२. यासदंर्भात शिव पटेल नावाच्या एका हिंदु तरुणानेही पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. पटेल त्याच्या मित्रांसमवेत १० ऑगस्ट या दिवशी एका शाळेतील मैदानात खेळत असतांना बाबू कुरेशी याचे काही मित्र हातात काठ्या आणि पाईप घेऊन आले आणि त्यांनी सूरजविषयी विचारले. पटेल आणि त्याचे मित्र यांनी, ‘सूरजविषयी काही ठाऊक नाही’, असे सांगितल्यावर कुरेशीच्या मित्रांनी सर्वांना मारहाण केली.
संपादकीय भूमिकाबहुसंख्य हिंदूंच्या देशात अधिकाधिक असुरक्षित बनत चाललेला हिंदु समाज ! पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंप्रमाणे भारतीय हिंदूंची दुरवस्था होण्याआधीच हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! |