शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेणार्‍या ४३७ अधिकार्‍यांना ९ वर्षांत अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

नगर – शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेणार्‍या ४३७ अधिकार्‍यांना लाचलुचपतविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यात रोजगार हमी आणि घरकुल योजनांच्या लाभासाठी सर्वाधिक लाच मागितल्याचे सिद्ध झाले आहे. ९ वर्षांतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांत ४० पेक्षा अधिक कल्याणकारी योजनांत ४३७ लाचखोर अधिकार्‍यांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. वर्ष २०१४ ते २०२२ या कालावधीत रोजगार हमी योजनेत विविध अनुदानांसाठी लाभार्थ्यांकडून लाच मागण्याच्या १०० प्रकरणांत कारवाई झाली. नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी ‘इंदिरा आवास’ योजना, ‘रमाई आवास’ योजना आणि ‘पंतप्रधान आवास’ योजना यांसारख्या योजनांसाठी लाभार्थींची अडवणूक होते.

संपादकीय भूमिका

  • शासनाने केलेल्या कल्याणकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार करणारे अधिकारी समाजद्रोहीच होत !
  • शासनाच्या कल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यामध्येच घोटाळा होत असेल, तर याहून दुर्दैवी आणि संतापजनक काय असू शकते ? यातून शासकीय स्तरावर कार्य करणार्‍यांमध्ये भ्रष्टाचार किती मुरला आहे, हे लक्षात येते. अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षाच हवी.