नशा येण्यासाठी घेतल्या जाणार्‍या झोपेच्या ६ सहस्र गोळ्यांची जादा दराने विक्री !

डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विकता न येणार्‍या आणि नशा येणार्‍या झोपेच्या ६ सहस्र गोळ्या विकणार्‍या आणि त्याची बनावट देयके करून शासनाची फसवणूक करणार्‍या मेडिकल दुकानदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अमरावती येथे पारपत्र कार्यालयातील सर्व्हर ‘डाऊन’ झाल्याने कामकाज ठप्प !

सर्व्हर ‘डाऊन’ झाल्याने येथील पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. सर्व्हर सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजून १५ मिनिटांपर्यंत बंद होता.

गोमूत्र आणि शेणखत यांद्वारे कांद्याचे विक्रमी उत्पादन !

माढा तालुक्यातील ढवळस येथील शेतकरी शहाजी पाटील यांनी शेतीत खत टाकतांना, तसेच फवारणी करतांना केवळ गो-उत्पादनांचा वापर करून अन्य रासायनिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या तुलनेत चांगले उत्पादन मिळवले आहे.

तमिळनाडूतील हिंदूंना हे मान्य आहे का ?

‘तमिळनाडूच्या विकासामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्याखेरीज तमिळनाडू हे जंगलराज असलेल्या बिहारसारखे बनले असते’, असे संतापजनक विधान तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम्. अप्पावू यांनी केले.

आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून ‘व्हायरल फिव्हर’ (विषाणूजन्य ताप) !

आता आपण आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून ‘व्हायरल’ तापाचा विचार करूया. सगळेच संसर्गजन्य आजार हे श्वास, स्पर्श, एकशय्या, एकवस्त्र, एक पादत्राण, सहभोजन (एका ताटात/ एकमेकांचे उष्टे अन्न खाणे किंवा उष्टे पेय पिणे) यातूनच पसरतात.

‘मंकीपॉक्स’ आजार : लक्षणे, उपाय आणि जागरूक रहाण्याची आवश्यकता !

गेल्या मासापर्यंत ‘मंकीपॉक्स’ या आजाराचे नाव आफ्रिकेबाहेर कुणालाही ठाऊक नव्हते. भारतात आतापर्यंत ४ रुग्ण सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मंकीपॉक्सचे आतापर्यंत विविध देशांमध्ये १५ सहस्र ७३४ रुग्ण सापडले आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते.

भारतीय राज्यघटनेनुसार ‘भाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या मूलभूत अधिकारामध्ये ‘वृत्तपत्र स्वातंत्र्य’ अन् ‘माहितीचा अधिकार’ समाविष्ट असणे

भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या भागात नमूद करण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये स्वातंत्र्याच्या अधिकाराचा समावेश करण्यात आला आहे. १९ (१) कलमाप्रमाणे नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य देण्यात आले आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधांच्या समाप्ती तिथीविषयी (एक्सपायरी डेटविषयी) अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने केलेला अभ्यास

अमेरिकेच्या सैन्याकडे आपत्कालीन साहाय्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा केलेला असतो. सैन्याला यातील कोट्यवधी डॉलर्सची औषधे केवळ समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) झाली; म्हणून फेकून देऊन नवीन विकत घ्यावी लागत.

जगभरातील देश, संयुक्त राष्ट्र आणि भारत यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा ! – पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष, अध्यक्ष, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराविषयी सरकार गप्प का ?’

कर्करोगासारख्या गंभीर आजारातही साधनेची तीव्र तळमळ असलेल्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे (वय ७४ वर्षे) !

१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे कर्करोगाने निधन झाले. २७.७.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.