गोमूत्र आणि शेणखत यांद्वारे कांद्याचे विक्रमी उत्पादन !

प्रातिनिधिक छायाचित्र

सोलापूर – माढा तालुक्यातील ढवळस येथील शेतकरी शहाजी पाटील यांनी शेतीत खत टाकतांना, तसेच फवारणी करतांना केवळ गो-उत्पादनांचा वापर करून अन्य रासायनिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या तुलनेत चांगले उत्पादन मिळवले आहे. शहाजी पाटील यांची ६ एकर शेती आहे. मागील वर्षीपासून त्यांनी सेंद्रीय शेती चालू केली. रासायनिक खतांसाठी पुष्कळ व्यय आणि त्या तुलनेत उत्पन्न मिळेल याची निश्चिती नसते. त्यामुळे त्यांनी रासायनिक खतांसाठी व्यय करायचा नाही, अशी भूमिका घेतली. सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रारंभी त्यांनी १ गाय विकत घेऊन गोमूत्र आणि गायीचे शेण यांचा वापर करण्यास प्रारंभ केला. १ एकर शेतात त्यांनी गायीचे शेण पसरवून कांद्याची लागवड केली. कांद्याला पाण्यातून गोमूत्र दिले, तसेच फवारणीसाठीही गोमूत्राचा वापर केला. गायीच्या उत्पादनांपासून सिद्ध केलेली खते कांद्याला दिली. त्यामुळे त्यांना एका एकरात २० टन कांद्याचे उत्पन्न मिळाले आहे.