कोरोनाच्या काळात विधानसभेच्या कामकाजात महाराष्ट्र १० व्या स्थानी, केवळ २२ दिवस कामकाज !

कोरोनाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या विधानसभेचे कामकाज केवळ २२ दिवस झाले. देशभरातील एकूण १९ राज्यांतील विधानसभेच्या कोरोनाच्या कालावधीत झालेल्या कामकाजाच्या तुलनेत महाराष्ट्र १० व्या स्थानावर गेला असल्याचे २६ जुलै या दिवशी ‘प्रजा फाऊंडेशन’ने पत्रकार परिषद घेऊन सांगितले

मुलांना आरोग्यदायी आणि संस्कारक्षम घडवा !

‘दशसूत्री’ मुलांच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे. १० सहस्र शिक्षकांना ‘दशसूत्री’ कार्यक्रम समजावून देण्यात येत आहे. सध्या ‘जंकफूड’मुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे पालकांचाही दृष्टीकोन पालटण्याचा प्रयत्न आहे.

लोकमान्य टिळक यांच्या जगण्यातून ध्येयनिष्ठा शिकायला हवी ! – पार्थ बावस्कर, इतिहास अभ्यासक

आजच्या तरुणांनी टिळकांच्या जगण्यातून आधुनिक मूल्यांचा स्वीकार, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि ध्येयनिष्ठा शिकायला हवी, असा सल्ला व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी दिला

तांत्रिक बिघाडामुळे पुण्यातील पारपत्र कार्यालयाची सेवा विस्कळीत !

सर्व्हरच्या कामात अडथळे आल्यामुळे ही गैरसोय झाल्याचे पारपत्र कार्यालयाने स्पष्ट केले. पुण्यासह परभणी, गोवा आणि गुजरात येथेही पारपत्र कार्यालयांचे काम काही घंटे बंद होते.

मुंबईत लोकल रुळावरून घसरल्याने लोकलची सेवा २ घंटे विस्कळीत !

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सी.एस्.एम्.टी.) स्थानकामध्ये लोकल रुळावरून घसरल्याने २ घंटे हार्बर मार्गावरील लोकलची सेवा विस्कळीत झाली होती. सकाळी ९.४० ते दुपारी १२.११ या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागला. सुदैवाने या घटनेत कुणीही घायाळ झाले नाही.

खासदारांच्या घरावर मोर्चे काढण्याचे अधिकार कुणी दिले ? – आमदार दीपक केसरकर

लोकांच्या घरांवर मोर्चे काढून आंदोलन करणे आतातरी थांबवा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत केली.

कावड यात्रेवरही धर्मांधांची वक्रदृष्टी !

कावड यात्रेवर होणारी धर्मांधांची आक्रमणे,ही त्यांना कुणाचेच भय राहिले नसल्याचे द्योतक !

अतिक्रमणाचा विळखा !

कोणतीही ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या अनुमतीविना मग ते भले रहिवासी असो किंवा व्यावसायिक दृष्टीने केलेले बांधकाम असो, ते प्रशासनाकडून अतिक्रमण म्हणून घोषित केले जाते.

चिंचवड येथील ‘चिंचवडे लॉन्स’मध्ये ‘श्रावणमास तपोनुष्ठान’ सोहळा !

येथील ‘चिंचवडे लॉन्स’मध्ये २८ जुलै ते २९ ऑगस्टपर्यंत ३२ व्या ‘श्रावणमास तपोनुष्ठान’ सोहळ्याचे आयोजन ‘ओम नम: शिवाय अधिष्ठान’च्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य संयोजक श्री. महेश स्वामी यांनी दिली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत संप !

प्रलंबित भाडे दरवाढ करणे, परवानेवाटप बंद करणे, तसेच रिक्शा-टॅक्सी व्यवसायिकांसाठी महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयी पुरवणे अशा विविध मागण्या मान्य न झाल्यास कोकण विभाग रिक्शा-टॅक्सी महासंघाने १ ऑगस्टपासून बेमुदत संपाची चेतावणी दिली आहे.